आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाशैक्षणिकसामाजिक

डॉ.राम आणि प्रा.लक्ष्मण नाईक जाधव या जुळ्या बंधूचा वाढदिवस रक्तदान उपक्रमाने साजरा

भोकर येथील विमल ग्रुप ऑफ स्कुलने स्तुत्य उपक्रमातून जपली सामाजिक सेवाभावाची बांधिलकी...!

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर येथील शिक्षण क्षेत्रातील नामांकित असलेल्या विमल विमल ग्रुप ऑफ स्कुल्सचे संचालक डॉ.राम नाईक जाधव व प्रा.लक्ष्मण नाईक जाधव या जुळ्या भावांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विमल इंग्लिश स्कूल,विमल इंटरनॅशनल स्कूल आणि रामरतन नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून हार तुरे,केक किंवा अन्य कुठल्याही अनाठायी खर्चीक बाबीला वाव न देता सामाजिक व सेवाभावाची बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमास रक्तदात्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने हा वाढदिवस आगळावेगळा ठरला आहे.

भोकर येथील वैद्यकीय व शिक्षण क्षेत्रातील नामांकित असलेल्या विमल ग्रुप ऑफ स्कूलचे संचालक डॉ.राम नाईक जाधव व प्रा.लक्ष्मण नाईक जाधव या जुळ्या भावाचा दि.५ नोव्हेंबर २०२६ रोजी वाढदिवस होता.या वाढदिवसाच्या औचित्याने विमल इंग्लिश स्कूल,विमल इंटरनॅशनल स्कूल आणि रामरतन नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने जीवन ज्योत हॉस्पिटल व विमल इंग्लिश स्कूल,किनवट रोड भोकर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.’रक्तदान म्हणजे जीवनदान’ आणि ही सेवा म्हणजेच मानवता जपणे असा संदेश देणाऱ्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भोकर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष भगवान दंडवे व स्व.डॉ. शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे सभापती जगदीश पाटील भोसीकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री तथा संचालक रामचंद्र मुसळे, उपनगराध्यक्ष दिलीप सोनवाडे,उपसभापती बालाजी श्यानमवाड,नगरसेविका प्र.डॉ.मनोज गिमेकर,गौतम कसबे,डॉ.बालाजी बिल्लरवार आंदबोरीकर,नगर परिषद आरोग्य व स्वच्छता सभापती प्र.तथा डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.फेरोज इनामदार,पत्रकार एल.ए.हिरे,मनोजसिंह चौहान,विनोद चव्हाण,डॉ.विठ्ठल माने,डॉ.साईनाथ वाघमारे.डॉ मुक्कनवार, सुनील दामनवाड,साहित्यिक चंदू चक्रावार ईशवर नाईक, प्रलाद राठोड,मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थी यांसह आदींची उपस्थिती होती.

या रक्तदान शिबिरात साहित्यिक चंदू चक्रावार,प्रल्हाद राठोड,डॉ.राम नाईक जाधव,ईश्वर नाईक जाधव,वैष्णवी गायकवाड,स्वाती दोडके,पत्रकार विशाल जाधव,सादिक शेख,मंगेश जाधव,जावेद शेख,गजानन लिमकर,राजाराम लहेवार,योगेश्वर शिंदे, राजकुमार कदम,अहेमद शेख,शेखर गुड्डेली,साहेबवराव कुंभारवाड,अतुल नागलपल्ले,संतराम लोखंडे,योगेश भाऊ, नागेश सोळंके,सौ.ज्योती गायकवाड, श्रीकांत भाऊ,रोहन हनवते,रामदास,लक्ष्मण वाघमारे,पी.के. राठोड यांसह जवळपास ५१ जणांनी सहभागी होऊन रक्तदान केले.तर या दात्यांचे रक्त श्री गुरू गोविंदसिंघजी सेवाभावी प्रतिष्ठान संचलित व जनकल्याण आणि वैद्यकीय सेवा संलग्नित श्री गोळवलकर गुरुजी रक्तकेंद्र,नांदेड यांच्या वैद्यकीय पथकाने संकलीत केले.याच बरोबर रामरतन नर्सिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी होतकरू विद्यार्थीनींच्या शैक्षणिक व प्रात्यक्षिक गरजांचा विचार करून त्यांना थर्मामीटर किटचे वाटप करण्यात आले. एकूणच संवेदनशिलता,मानवता व सेवाभाव जपून उपरोक्त सेवाभावी उपक्रमातून नाईक जाधव बंधूचा वाढदिवस आशा प्रकारे साजरा करण्यात आल्याने या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close