भोकर येथील श्री शाहू महाराज विद्यालयात ‘राष्ट्रीय जंतनाशक मोहीम’ संपन्न
विद्यार्थ्यांना सदरील मोहिमेविषयी करण्यात आले मार्गदर्शन व खाऊ घालण्यात आल्या जंतनाशक गोळ्या

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिना निमित्त दि.२७ ऑक्टोबर रोजी श्री शाहू महाराज विद्यालय भोकर येथील १ ते १९ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येऊन उपरोक्त मोहिमेविषयी माहितीपर मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनुपमा शिंदे,निवासी वैद्यकीय अधिकारी
डॉ.राजाभाऊ बुट्टे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रताप चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय भोकर व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर यांच्या अंतर्गत राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिनानिमित्त दि.२७ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री शाहू महाराज विद्यालय,भोकर येथे विद्यार्थ्यांना जंतनाशक मोहीम विषयी मार्गदर्शन करून गोळ्या खाऊ घालण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी आरबीएसकेचे जिल्हा समन्वयक अनिल कांबळे यांनी महाविद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करून सेवन करायला लावले.तसेच आरबीएसके पथकाचे डॉ.वेंकटेश टाकळकर,डॉ.ज्योती येन्नावार,डॉ.अपर्णा जोशी,औषध निर्माण अधिकारी संदीप ठाकूर,गिरी रावलोड,योगेश पवार,आरोग्य सेवक, आरकेएसके समुपदेशक सुरेश डुमलवाड,परिचारिका वागतकर यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता.निरोगी विद्यार्थी-सुदृढ भविष्य हे ब्रीद लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राखणे व जंत संसर्गापासून संरक्षण करणे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याने मुख्याध्यापक के.एन.किनेवाड यांनी उपरोक्त सर्वांचा यथोचित सत्कार करुन आभार मानले.




