आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकियसामाजिक

भोकर येथे ४० दृष्टीदिव्यांग अंध विद्यार्थ्यांचा विमा काढून करण्यात आले शैक्षणिक साहित्याचे वाटप

भाजपाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर यांनी सेवाभावी उपक्रमातून माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांचा वाढदिवस केला साजरा

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राज्यात कोरडा दुष्काळ घोषित केला असल्याने हार तुरे व कुठलाही अनाठायी खर्च करण्यात येऊन माझा वाढदिवस कोणीही साजरा करु नये,असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी केल्यामुळे कसलाही बडेजाव न करता भाजपाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे संचालक किशोर पाटील लगळूदकर यांनी सेवाभाव जोपासत दि.२८ ऑक्टोबर रोजी सावित्रीबाई फुले अंध मुलींची निवासी शाळा भोकर येथील ४० दृष्टीदिव्यांग अंध विद्यार्थिनींचा विमा काढून व शालेय साहित्य वाटप करून माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने साजरा केला आहे.खरीप हंगाम वाया गेला व राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.तसेच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याने वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करणे हे उचित नव्हे,म्हणून माझा वाढदिवस मी साजरा करणार नाही व हार तुरे आणि अनाठायी खर्च कोणीही करु नये असे आवाहन खा. अशोक चव्हाण यांनी केले होते.ही बाब लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले अंध मुलींची निवासी शाळा भोकर चे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सेवाभावी उपक्रम राबवून खा.अशोक चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले.तसेच या शाळेतील ४० दृष्टीदिव्यांग अंध विद्यार्थीनींचा विमा काढणे व शैक्षणिक साहित्य वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन उपरोक्त उल्लेखीत शाळेत केले होते.

कै.सटवाजी पाटील किन्हाळकर शिक्षण प्रसारक मंडळ, लगळूदचे अध्यक्ष,उपरोक्त निवासी शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर यांनी दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी व सुरक्षिततेची घेत वाटप करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्यातून विद्यार्थिनींना अध्ययनासाठी दैनंदिन जीवनात मदत व्हावी या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविला. एकूणच सामाजिक बांधिलकी जोपासत सेवाभावी उपक्रम राबवून माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा केला.

हा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि विद्यालयाच्या प्राचार्या सौ.फुलारी,सौ.कोमल गाडी,सौ चौदंते,सुनील नाईक पाटील, तेले यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.तर सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर पाटील लगळूदकर यांनी केले व सुत्रसंचालन मुरलीधर गोडबोले यांनी केले आणि उपस्थितांचे आभार जगदीश पाटील कदम यांनी मानले.तसेच या कार्यक्रमास दिव्यांग शाळा व कृषि विद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close