आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकिय

सुसज्ज बाजारपेठेसाठी व्यापाऱ्यांनी भोकर एम.आय. डी.सी.ची जागा खरेदी करावी-खा.अशोक चव्हाण

पुरग्रस्तांसाठी खा.अशोक चव्हाण यांच्याकडे स्व.डॉ. शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर च्या वतीने दिला २ लाख ११ हजार रुपयाचा धनादेश

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर शहराची वाढती व्याप्ती पाहता बाजार पेठेचेही नुतनीकरण होणे गरजेचे आहे.भाजीपाला बाजापेठ असो वा अन्य बाजारपेठेसाठी शहरातील जागा अपुरी पडत असून त्यामुळे अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होत आहेत.हे होऊ नये म्हणून नुतन बाजारपेठ निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भोकर (एम.आय.डी.सी.)च्या जागेत लाईट,पक्के रस्ते व पाण्याची ही सोय उपलब्ध करण्यात आली असून येथील जागा खरेदी करुन व्यापारी संकुल उभे करण्यासाठी अधिकाधिक व्यापारी आणि व्यापारी संघटनांनी पुढाकार घ्यावा असे,आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे.ते स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर येथे आयोजित दिवाळी स्नेहभेट कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर च्या वतीने दि.२४ ऑक्टोबर रोजी दिवाळी निमित्त स्नेहभेट व चहा पान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रम प्रसंगी आमदार श्रीजया चव्हाण,माजी आ.अमरनाथ राजूरकर,सभापती जगदीश पाटील भोसीकर, उपसभापती बालाजी शानमवाड,भाजपचे तालुकाध्यक्ष दिवाकर रेड्डी,जिल्हा उपाध्यक्ष किशोर लगळूदकर, भगवानराव दंडवे,माजी सभापती प्रकाशराव देशमुख भोसीकर,जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील कापसे,संचालक रामचंद्र मुसळे,डॉ.बालाजी अंदबोरीकर,आत्रिक मुंगल, माधव अमृतवाड, बाजार समितीचे संचालक व सचिव पी.यू.सूर्यवंशी, व्यापारी बांधव यांसह आदींची उपस्थिती होती. तर पुढे बोलतांना खा.अशोक चव्हाण म्हणाले की,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भोकर च्या जागा विक्रीत काही प्रकारे अनियमितता झाली होती व त्यातून काही गैर व्यवहार ही होण्याची शक्यता होती.त्याविषयी आम्ही लक्ष घालून तो प्रकार थांबविला असून आता नव्याने खरेदी विक्री प्रक्रिया करण्यात येणार आहे.त्यामुळे सर्व व्यापारी व व्यापारी संघटनांनी तेथील जागा खरेदी करावी,तसेच नगर परिषदेंतर्गत विकास करण्यासाठी भोकर,मुदखेड व अर्धापूर या तीन नगरप रिषदेतील विकास कामांसाठी नुकताच ११ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.तसेत भोकर शहर, तालुका व मतदार संघाच्या विकासासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व पक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकदिलाने काम करावे,असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. पुरग्रस्तांसाठी बाजार समितीने खा.अशोक चव्हाण यांच्याकडे दिला २ लाख ११ हजार रुपयाचा धनादेश

राज्यात व भोकर तालुक्यात ही अतिवृष्टी व पुराने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत निधी देत आहे. परंतू तो तुटपुंजा होत असल्याने दानशूरांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. त्याच अनुषंगाने स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती भोकरच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी २ लाख ११ हजार रुपयांचा निधी पाठविण्यात येत असून त्या निधीचा धनादेश माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे यावेळी देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close