माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर येथे महिला आरोग्य शिबिर
जीवन ज्योत सामाजिक संस्था भोकर व गंगा हॉस्पिटल, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे करण्यात आले आहे आयोजन...

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : लोकोपयोगी समाजसेवी उपक्रमातून माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या उद्देशाने दि.२६ ऑक्टोबर रोजी भोकर येथे <span;>जीवन ज्योत सामाजिक संस्था भोकर व गंगा हॉस्पिटल, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा बहुसंख्येने गरजूंनी लाभ घ्यावा,असे आवाहन डॉक्टर असोसिएशन भोकर चे माजी तालुकाध्यक्ष तथा जीवन ज्योत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.राम नाईक जाधव यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांचा वाढदिवस दि.२८ ऑक्टोबर रोजी आहे. त्यांचा वाढदिवस लोकोपयोगी व समाजसेवी उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्याच्या उद्देशाने जीवन ज्योत सामाजिक संस्था भोकर व गंगा हॉस्पिटल, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजता पर्यंत डॉ.राम नाईक यांचे जीवन ज्योत हॉस्पिटल,किनवट रोड,भोकर येथे महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.यात महिलांसाठी आरोग्य तपासणी,स्त्रीरोग तपासणी(Gynec Check-up),मासिक पाळीतील अनियमितता तपासणी, पांढरा स्त्राव (Leucorrhoea) तपासणी,PCOD/PCOS तपासणी,गर्भाशयातील विकार तपासणी,वंध्यत्व (Infertility) सल्ला,ब्रेस्ट कॅन्सर प्राथमिक तपासणी, रजोनिवृत्ती (Menopause) सल्ला,हिमोग्लोबिन तपासणी (HB),मधुमेह तपासणी (Sugar),रक्तदाब तपासणी (BP), आदींची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून केली जाणार आहे व महिला तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य सल्ला ही देण्यात येणार आहे आणि मोफत औषधी वाटप देखील करण्यात येणार आहे.तरी या शिबिराचा लाभ गरजूंनी बहुसंख्येने घ्यावा,असे आवाहन डॉक्टर असोसिएशन भोकर चे माजी तालुकाध्यक्ष तथा जीवन ज्योत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ.राम नाईक जाधव यांनी केले आहे.




