नांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकियशेत शिवारसामाजिक

मौ.धानोरा येथील ८१ पुरग्रस्त कुटूंबांना आ.ॲड.श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते प्रत्येकी १० हजारांचे धनादेश वाटप

दिवशी बु.सिंचन तलाव बुडीत क्षेत्र जमिन संपादनाचा १ कोटी १७ लाख ९० हजारांचा मावेजा ८ शेतकऱ्यांना वाटप

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : दि.२९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे भोकर तालुक्यातील मौ.धानोरा या गावातील अनेक घरांत सुधा नदीच्या पुराचे पाणी घुसले होते.यात ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले होते.त्या अनुषंगाने यातील नुकसानग्रस्त ८१ कुटूंबांना प्रत्येकी १० हजार रुपये मदत निधीचा धनादेश, भोकर तहसिल कार्यालया मार्फत आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते दि.९ सप्टेंबर २०२५ रोजी वाटप करण्यात आला.
तसेच दिवशी बु.ता.भोकर येथील सिंचन तलावासाठी भुसंपादित केलेल्या जमिनीचा काही शेतकऱ्यांचा मावेजा प्रलंबित होता.त्यापैकी १ कोटी १७ लाख ९० हजार २६८ रुपये रक्कम भुसंपादन अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाली होती.ती रक्कम बँकेत जमा करण्यात आली असून त्या अनुषंगाने दि.९ सप्टेंबर २०२५ रोजी बुडीत क्षेत्रातील एकूण ८ शेतकऱ्यांना सदरील रक्कमेचे धनादेश भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार ॲड.श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहेत.

यावेळी तहसिलदार विनोद गुंडमवार, पाटबंधारे विभागाचे अधिकारी,भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close