पोमनाळा येथील शेतकरी अनिलकुमार मोरे यांचे विविध मागण्यांसाठी अमरण उपोषण सुरू
भुमिहिन कुटूंबांना दिवाळी सणासाठी तात्काळ दोन हजार रुपये द्यावेत यांसह आदी मागण्यांसाठी भोकर तहसिल कार्यालयासमोर होत आहे हे उपोषण

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : दुष्काळ परिस्थितीशी सामना करतांना गरीब व भुमिहिन नागरिकांना आर्थिक संकटांशी मोठा सामना करावा लागत आहे.त्यामुळे दिवाळी सण साजरा करण्यासाठी २ हजार रुपयांची सरकारने मदत करावी. पोमनाळा येथील नागरिकांपुढे भिषण पाणी टंचाई असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा व गायरान जमीनिचे पट्टे वाटप करावेत यांसह आदी मागण्यांसाठी पोमनाळा ता.भोकर येथील शेतकरी अनिलकुमार मोरे यांनी दि.२ नोव्हेंबर पासून तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे.
राज्यातील तसेच भोकर तालुक्यातील नागरिक कोरड्या दुष्काळाने होरपळली जात आहेत.गरीब व भुमिहिन कुटूंबांना आर्थिक संकटांशी मोठा सामना करावा लागत असून दिवाळी सण कसा साजरा करावा? हा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे सरकारने मौ.पोमनाळा व पोमनाळा तांडा ता.भोकर येथील भुमीहीन कुटुंबाना दिवाळी साजरी करण्यासाठी सरकारने दोन हजार रुपयांची तात्काळ मदत करावी व ती त्याच्या बँक खात्यात जमा करावी.पोमनाळा व पोमनाळा तांडा येथील भिषण पाणी टंचाई पाहता शासकीय आडात टँकरने पाणी सोडावे,तसेच दि.१ जानेवारी २०२७ पासून सतत टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा.भुमीहीन एन.सी.३५ कुटुंबांचे लाईटबिल तगादा लावून सक्तीने वसूल करु नये व ते भरण्यासाठी १ वर्षांची वसुलीचे ताकीद करण्यात येऊ नये एका वर्षाची मुदत द्यावी.मौ.पोमनाळा येथील एन.सी.३५,२ मुस्लिम,२ वडार समाजातील भुमिहिन कुटूंबांना गायरान जमीनिचे पट्टे नावे करुन ते वाटप करावेत.याच बरोबर भोकर तालुक्यातील सर्व नागरिकांच्या उपरोक्त समस्या तात्काळ सोडवाव्यात.

उपरोक्त उल्लेखीत मागण्यांना प्राधान्य देऊन सरकार व संबंधित विभागांनी तात्काळ त्या मागण्या पुर्ण कराव्यात. याविषयी मौ.पोमनाळा ता.भोकर येथील शेतकरी अनिल सुधाकर मोरे यांनी राज्य सरकार,संबंधित विभांगाचे मंत्री व वरीष्ठ अधिकारी यांना तहसिलदार भोकर यांच्या मार्फत निवेदन पाठविले असून त्या मागण्या मंजूर करण्यात याव्यात यासाठी दि.२ नोव्हेंबर २०२६ रोजी पासून तहसिल कार्यालय भोकर समोर त्यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे.सदरील मागण्या संदर्भाने तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी त्या त्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केला असून त्या मागण्या पुर्ण कराव्यात असे सुचविले आहे.तर या उपोषणाला पोमनाळा येथील महिला, पुरुष व प्रतिष्ठित नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. तसचे उपोषण स्थळी उपस्थित राहून दत्तू पाटील सोळंके, राजेश सुर्वेस्कर,हाजी शेख रहेमान,दत्ता भगवान सुर्वेस्कर, सतिश खंडेलोटे,केरबाजी खंडेलोटे,विठ्ठलराव मुतनेपवाड, बालाजी सुर्वेस्कर,सोपान मोरे,लक्ष्मण जलदारे,प्रल्हाद मोरे (माजी सरपंच),पार्वतीबाई सुर्वेस्कर,चंद्राबाई मोरे,मंगलबाई खंडेलोटे,कांताबाई वाघमारे,ललिता मोरे,अरविंद खंडेलोटे, विजय खंडेलोटे,सतिश खंडेलोटे,अंगिरस खंडेलोटे यांसह आदी नागरिकांनी या अमरण उपोषणास पाठींबा दिला असून असून उपरोक्त मागण्या तात्काळ पुर्ण न केल्यास पुढे हे आंदोलन तीव्र करु असा इशारा उपोषणकर्ते अनिल मोरे यांनी दिला आहे.




