आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडासामाजिक

पोमनाळा येथील देवी भवानी मातेची ५१ जोडप्यांसह गंगाधर सादुलवार मित्र मंडळाने केली महाआरती

भोकर ची दसरा सिमोल्लंघन मानाची पालखी मिरवणूक व रावण दहन परंपरा यावर्षी झाली खंडित...

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : सिमोल्लंघन व देवी दर्शनाने विजयादशमी तथा दसरा सण साजरा केल्या जाणाऱ्या भोकर तालुक्यातील मौ.पोमनाळा येथील एकमेव असलेल्या माता भवानी देवीच्या मंदीरात दि.२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी उद्योजक गंगाधर सादूलवार व मित्रमंडळाच्या वतीने पारंपारिक वेशभुषेत ५१ जोडप्यांसह विधिवत महाआरती करण्यात आली आणि उत्साहात दुसरा सण साजरा करण्यात आला.
मौ.पोमनाळा ता.भोकर येथे अतिशय जुने माता भवानी देवीचे तालुक्यातील एकमेव मंदीर आहे.अनेक वर्षांपासून सदरील मंदीरातील देवीचे दर्शन घेऊन सिमोल्लंघन करुन विजयादशमी साजरी करण्याची परंपरा आहे.याच औचित्याने भोकर येथील उद्योजक गंगाधर सादूलवार व मित्रमंडळाच्या वतीने दि.२ ऑक्टोबर २०२५ रोजी माता भवानी देवीची विधिवत पूजा आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुतारी,बँडपथकासह पारंपारिक वाद्यांच्या गजरात मंगलमय वातावरणाची निर्मिती करण्यात आली होती.तर बहुसंख्येने उपस्थित असलेल्या भाविकांसह भगवे फेटे बांधून व पारंपरिक वेषभुषा करुन ५१ जोडप्यांनी माता भवानी देवीची विधिवत पुजा आणि महाआरती केली.त्यानंतर महाप्रसादाचा सर्व उपस्थितांनी आस्वाद घेतला.

सदरील पुजा व महाआरती कार्यक्रमात भोकर व तालुक्यातील गणमान्य अशा भोकर नगरीच्या माजी नगराध्यक्षा व माजी नगराध्यक्ष सौ.संगिता विनोद पाटील चिंचाळकर,सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील गौड, सुरेश सादुलवार,गोविंद सादुलवार,कृष्णा गोडसेलवार,महेश चक्रवार,व्यंकटेश असावा,विठ्ठल पाटील धोंडगे, गिरीधारी दरक,गिरधारी शेठ उमरीकर,दीपक सोनटक्के,पवन मुंदडा, श्रीनिवास शहागंटवार,सतीश शहाणे,अमित चिंतावार,संगीत क्षेत्रातील शिव मठपती,राधेश्याम चाटलवार,सुरेश ठोणे, बाळू सारडा,संतोष उत्तरवार,अमोल शहागंटवार,गणेश यशवंतकर,सतीश बच्चेवार,अनिल माळवंतकर,पत्रकार बी.आर.पांचाळ,प्रवीण चेपूरवार,ओम श्रीरामवार,अमोल सादुलवार,संतोष चेपूरवार,राजू कोरटे,शुभम इंगलवार,पवन चेपूरवार, बाळू मंठाळकर,राजेंद्र अनमोलवाड,वेनूगोपाल असावा,अशोक नेमानिवार,बालाजी सादुलवार,माजी नगराध्यक्ष साहेबराव सोमेवावाड,स्वप्निल पोकलवार यांसह आदी जोडप्यांनी सहपत्नीक सहभाग घेतला होता.तर विशेष बाब म्हणजे यांच्या व्यतिरिक्त पोमनाळा येथील माहेरी आलेल्या ११ बाई-लेकीच्या जोडप्यांनीही यात सहभाग घेतला होता.

भोकर ची सिमोल्लंघन मानाची पालखी मिरवणूक व रावण दहन परंपरा यावर्षी झाली खंडित…

पुर्वजांनी सांगितलेल्या आख्यायिका प्रमाणे असे की,अनेक वर्षांपूर्वी मौ.पोमनाळा ता.भोकर येथील काही नागरिक पायी दिंडीने भवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे गेले होते.यावेळी तेथील पुजाऱ्यांनी सदरील नागरिकांना देवी दर्शनानंतर तुळजा भवानीची प्रतिकात्मक एक छोटीशी लाकडी मुर्ती दिली होती व ‘या मुर्तीच्या रुपाने देवी माता तुच्या गावाचे रक्षण करेल आणि सुख समृद्धी समृद्धी आणेल’,असा आशिर्वाद दिला.हा आशिर्वाद घेऊन गावी पक्षात आलेल्या भक्तांनी गावाशेजारील शेतात ‘त्या’ मुर्तीची प्रतिष्ठापना केली.तेंव्हापासून सदरील माता भवानी देवीची भक्तीभावाने पूजा-अर्चा करण्यास सुरुवात झाली.नव्हे तर देवी भवानी मातेचे तालुक्यात एकमेव मंदीर असल्याने सदरील मंदीरास एक विशेष महत्त्व असून विजयादशमी दसरा सणानिमित्त पोमनाळा,भोकर व तालुक्यातील असंख्य नागरिक सिमोल्लंघन,सोने लुटीनंतर या देवी मातेचे मनोभावे दर्शन घेतात व हा सण उत्साहात साजरा करतात. तसेच भोकर येथील दसऱ्याचे मानकरी सहवाद्य पालखीची मिरवणूक काढून सिमोल्लंघनासाठी गांधीनगर भोकर येथील ‘दसऱ्याचा मारुती मंदीर’ व पोमनाळा येथील मानाच्या माता भवानी देवीच्या मंदीरास जाऊन आपटा, शमीचे पर्णरुपी सोने अर्पण करुन आणि एकमेकांना ते सोने देऊन सण साजरा करतात,अनेक वर्षांची ही परंपरा आजही सुरु आहे.

सन २००१ मध्ये नवरात्रोत्सव दुर्गा देवी विसर्जन मिरवणूकी दरम्यान भोकर येथे एक दंगल झाली व हिंदूंच्या मनात एक प्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण झाले.हे भितीचे सावट दूर व्हावे व सर्वांच्या सहभागातून विविध समाजसेवी कार्यक्रम आणि उपक्रमांनी सण उत्सव आनंदात साजरे करण्यात यावेत या उदात्त हेतूने तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास पोटे यांच्या पुढाकारातून ‘गौरी गणेश महासंघाची’ स्थापना करण्यात आली.सदरील महासंघात भोकर येथील सर्वपक्षीय,सर्व धर्मीय,सर्व सामाजिक संघटना,व्यापारी,शेतकरी,अधिकारी,कर्मचारी, प्रतिष्ठीत नागरिक यांसह पुर्वीची भोकर ग्रामपंचायत व नंतरच्या नगर परिषदेने हिरीरीने सहभाग घेतला.आणि सन २००२ पासून दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याचे मानकरी,विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरिक,भाविक भक्त व आदींचा सहभागातून श्री बालाजी मंदिर,नवा मोंढा भोकर येथून दसऱ्याचा मारुती मंदिर गांधी नगर व पोमनाळा येथील माता भवानी देवीच्या मंदिराकडे मानाच्या पालखीची सहवाद्य आणि भव्य आतिशबाजी करत मिरवणूक काढण्याची आणि सिमोल्लंघनानंतर दसऱ्याचा मारुती मंदिर परिसरात ‘रावण दहण’ करण्याची परंपरा सुरु झाली. यात प्रामुख्याने माजी सभापती तथा माजी उपनगराध्यक्ष नागनाथ घिसेवाड यांचा पुढाकार असायचा.दरम्यानच्या काळात काही राजकीयांच्या स्वार्थी हेतूचा यात प्रादुर्भाव झाला व हळूहळू त्यांनी यातून अंग काढून घेण्यास सुरुवात केली.परंतू नागनाथ घिसेवाड यांनी ती परंपरा अखंडीत ठेवली होती.असे असले तरी सन २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागनाथ घिसेवाड यांचा पराभव झाला व ते मनाने खचले.यामुळेच त्यांनी भोकर येथील शिवरात्री निमित्ताने होणाऱ्या महादेवाच्या यात्रेतून अंग काढून घेतले.त्यामुळे मागील वर्षी भोकर येथील ऐतिहासिक महादेव मंदीर परीसरातील महाशिवरात्री यात्रा खंडित झाली.तसेच यावर्षी ‘रावण दहन’ ही होऊ शकले नाही व रावण दहनाची परंपरा ही खंडित झाली.यामुळे भोकर व परिसरातील नागरिकांना रंगीबेरंगी आणि विविध आवाजाच्या गगनचुंबी भव्य आतिश बाजीचा आनंद घेता आला नाही.तसे पाहता नागनाथ घिसेवाड यांनी जरी यात पुढाकार घेण्याचे नाकारले असले तरी हा कार्यक्रम सार्वजनिक असल्याने येथील सत्ताधारी खासदार,आमदार व त्यांचा समर्थकांनी हा कार्यक्रम हाती घ्यायला हवा होता. त्यांना कोण रोखले ? यावर प्रश्नचिन्ह असून भविष्यात येथील सत्ताधाऱ्यांनी खंडित झालेली ही परंपरा पुन्हा सुरु केली पाहिजे,अशी अपेक्षा अनेकांतून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close