आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराज्यसामाजिक

भोकर येथे होणाऱ्या पेरकी,पेरकेवाड समाज गुणगौरव सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे-गोविंद उल्लेवाड

दि.२६ ऑक्टोबर रोजी गुणवंत विद्यार्थी,यशवंत अधिकारी व कर्मचारी यांचा यथोचित सत्कार व गुणगौरव सोहळ्याचे करण्यात आले आहे आयोजन

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : मराठवाडा व विशेषतः नांदेड जिल्ह्यातील पेरकी,पेरकेवाड,पेरकेवार समाजातील गुणवंत विद्यार्थी,नौकरीस पात्र ठरलेले यशवंत अधिकारी व कर्मचारी यांच्या यथोचित सत्कार आणि गुणगौरव सोहळ्याचे आयोजन दि.२६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता गणराज फंक्शन हॉल,भोकर येथे करण्यात आले असून या सोहळ्यास समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन या सोहळ्याचे मुख्य आयोजक सामाजिक नेते तथा शासकीय कंत्राटदार गोविंदराव सटवाजी उल्लेवाड यांच्यासह सोहळा आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
नांदेड जिल्हा व मराठवाड्यातील पेरकी,पेरकेवाड,पेरकेवार हा समाज अल्पसंख्याक असून सदरील समाजाची सामाजिक,शैक्षणिक,राजकीय व कृषि यांसह आदी क्षेत्रात म्हणावी तशी प्रगती झालेली नाही.असे असतांनाही प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन सद्य परिस्थितीत समाजातील अनेक गुणवंत विद्यार्थी विविध शाखेतील विषयांत चांगल्या प्रकारे गुणप्राप्त करुन उच्च शिक्षणासाठी पात्र ठरत आहेत.तर काहीजण शिक्षणाच्या बळावर विविध विभागांत शासकीय नौकरीस पात्र ठरले आहेत.अशा गुणवंत विद्यार्थ्यांचे व नौकरीस पात्र ठरलेल्या यशवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन गुणगौरवाने त्यांना प्रोत्साहित करणे हे समाजाचे कर्तव्य आहे.कारण हे सारे समाजाच्या भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत.तसेच यांच्या माध्यमातून समाजात जनजागृती ही होऊ शकते,या पार्श्वभूमीवर समाजातील काही मान्यवरांचे मार्गदर्शन होईल या उदात्त हेतूने दि.२६ ऑक्टोबर २०२५ रोजी गणराज फंक्शन हॉल, भोकर येथे उपरोक्त उल्लेखीतांच्या सत्कार व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील सोहळ्यास मराठवाडा,विदर्भ,तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्यातील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित राहणार आहेत.

सदरील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक नेते तथा शासकीय कंत्राटदार गोविंदराव सटवाजी उल्लेवाड हे राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून भोकर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार ॲड.श्रीजयाताई अशोकराव चव्हाण व प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार शंकर अण्णा पायली(आदिलाबाद – तेलंगणा राज्य),व आमदार गंप्पा गोवर्धन( कामारेड्डी विधानसभा-तेलंगणा राज्य)यांची उपस्थिती राहणार आहे.या सोहळ्याच्या अनुषंगाने आयोजन समितीच्या वतीने दि.१२ ऑक्टोबर २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह भोकर येथे एक पत्रकार परिषद घेण्यात आली व यात सोहळ्याचे मुख्य आयोजक गोविंदराव उल्लेवाड यांनी उपरोक्त माहिती दिली आहे. तसेच या सोहळ्यास समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन ही करण्यात आले आहे.
तसेच आयोजित सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आयोजन समिती गठीत करण्यात आली असून या समितीत सहाय्यक पो.नि.राजेश डाकेवाड,विधीज्ञ सुरेश पन्नसवाड,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक संभाजी आलेवाड,माध्यमिक शिक्षक बालाजी सुब्बनवाड,सोशल मिडिया प्रमुख राजेश शिंगनवाड,सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक अनगुलवार, प्रकाश बच्चेवार,स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे उपभापती बालाजी श्यानमवाड, माजी सभापती बाबुराव गोपतवाड,माजी सरंपच बालाजी शेंडगे,मारोतराव पिंगलवाड,माजी सरपंच बालाजी पिंगलवाड यांसह आदींचा समावेश असून यासर्वांसह अनेक समाज बांधव परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close