आपलं नांदेडक्रीडानांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराज्यशैक्षणिक

सातारा येथील राज्यस्तरीय अजिंक्यपद दांडपट्टा स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील ५ खेळाडूंनी केली विविध पदके प्राप्त

सदरील क्रीडा क्षेत्रात नांदेड जिल्ह्याचा बहुमान वाढविणाऱ्या या खेळाडूंचे विविध स्तरातून होत आहे अभिनंदन!

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : सातारा येथे संपन्न झालेल्या दुसरी राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील ५ खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्य गुणांची छाप सोडत विजयश्री चे विविध पदके प्राप्त केली असून या क्रीडा क्षेत्रात नांदेड जिल्ह्याचा बहुमान वाढविला असल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. दांडपट्टा क्रीडा कलेची राजधानी म्हणून परिचित असलेल्या सातारा जिल्हा येथे नुकतीच दुसरी राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाली. सदरील स्पर्धेत क्रीडा प्रशिक्षक तथा नांदेड जिल्हा दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हा सचिव बालाजी एल.गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली एकूण ५ खेळाडूंनी सहभागी होऊन जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व केले.तसेच आपल्या क्रीडा कला कौशल्य गुणांची छाप सोडत विजयश्री चे विविध पदके प्राप्त केले आहेत. यात सलग दुसऱ्या वर्षी सहभागी होऊन आपले क्रीडा कला कौशल्य दाखवत कु.सलोनी विनोद सुरदसे या खेळाडूने वरिष्ठ गटातून प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले.तर अजय संजय राठोड यांनी १४ वर्षे वयोगटातून तृतीय क्रमांक मिळवून ब्रांझ मेडल प्राप्त केले.तसेच कु. सिद्धी विवेक पवार हिने १८ वर्ष वयोगटात द्वितीय क्रमांक मिळवून सिल्वर मेडल प्राप्त केले.कु.जानवी गोविंद सोनारीकर हिने १६ वर्ष वयाच्या आतील वयोगटातून तृतीय क्रमांक मिळवुन ब्रांझ मेडल प्राप्त केले आहे आणि कु. ऋतुजा शिवाजी कदम हिने १६ वर्ष वयाच्या आतील वयोगटातून द्वितीय क्रमांक मिळवून सिल्वर मेडल प्राप्त केले आहे.
उपरोक्त ५ खेळाडूंनी नांदेड जिल्ह्या दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन चे प्रतिनिधित्व करत आपल्या नांदेड जिल्ह्याला ५ पदके मिळवून दिले आहेत.ही नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याने विजयश्री प्राप्त करणाऱ्या या खेळाडूंचे नांदेड जिल्हा दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष उत्तम बाबळे व मुख्य प्रशिक्षक तथा दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव बालाजी गाडेकर यांनी कौतुक केले आहे.तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी कु. सलोनी सुरदसे ची निवड झाली असल्याने पुढील यशासाठी तिला अगदी मनापासून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.तर उपरोक्त सर्व या विजयी खेळाडूंचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close