कवयित्री सोनाली बेले यांच्या काव्यसंग्रहाला शिवांजली साहित्य पुरस्कार जाहीर
साहित्य क्षेत्रासह अनेकांतून त्यांचे होत आहे अभिनंदन!

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकरदन : येथील रहिवासी तथा जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षिका सोनाली बेले यांच्या ‘अर्थ : व्हाट इट मिन्स टू बी’ या काव्यसंग्रहाला चाळकवाडी जि.पुणे येथील शिवांजली साहित्यपीठातर्फे शिवांजली साहित्य सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.सदरील प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रासह अनेकांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,चाळकवाडी ता.जुन्नर जि.पुणे येथील शिवांजली साहित्यपीठ आणि दीप ज्योती फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ३२ वर्षांपासून महाराष्ट्रातील उत्कृष्ट साहित्यिकांना शिवांजली सन्मान साहित्य पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे हे ३३ वे वर्ष असून,यावर्षीचा शिवांजली साहित्य सन्मान पुरस्कार येथील कवयत्री सोनाली बेले यांच्या ‘अर्थ : व्हाट इट मिन्स टू बी’ या पहिल्याच काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.येत्या ३ मे रोजी चाळकवाडी शैक्षणिक संकुलात होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सोनाली बेले यांच्या काव्यसंग्रहाला या वर्षातील हा सलग दुसरा पुरस्कार असून या पुरस्काराबद्दल सोनाली बेले यांचे जेष्ठ साहित्यिक सुरेश पाटोळे,यशोदिप प्रकाशनाच्या प्रकाशिका रुपाली अवचरे,बळी अंबुळगेकर,डॉ.मारोती कसाब,डॉ.मुकुंद राजपंखे,डॉ.संजय कसाब,अशोक बेले,प्रा. प्रतीक बेले,ज्येष्ठ लेखिका छाया बेले, प्रा.मेघा ढवळे यांनी अभिनंदन केले आहे.




