भोकर येथे आज राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सत्कार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका व शहर शाखा भोकर च्या वतीने उपस्थित राहण्याचे केले आहे आवाहन!

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(अजित पवार)नांदेड जिल्ह्याचे संपर्क प्रमूख ना.बाबासाहेब पाटील यांचा दि.२४ एप्रिल २०२६ रोजी भोकर जि.नांदेड येथे दौरा असून या औचित्याने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन नांदेड उत्तर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.तरी या सोहळ्यास सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका आणि शहर शाखा भोकर च्या वतीने करण्यात आले आहे.
भोकर येथे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा भोकर करीता एक भव्य इमारत बांधण्यात आली असून या इमारतीचा लोकार्पण सोहळा ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे.या निमित्ताने दि.२४ एप्रिल २०२६ रोजी त्यांचा भोकर येथे नियोजित दौरा असून या औचित्याने नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे संचालक बाळासाहेब पाटील रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोकर तालुकाध्यक्ष सुर्यकांत बिल्लेवाड,भोकर शहराध्यक्ष शेख जवाजोद्दीन बरबडेकर यांसह आदी पदाधिकारी यांच्या वतीने त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील सोहळा दुपारी ४:०० वाजता श्री समर्थ अर्बन बँकेचे मुख्य कार्यालय, मंजुळानगर भोकर येथे होणार आहे. सदरील सोहळ्यास आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर,मा.आ. ओमप्रकाश पोकर्णा,मा.आ.मोहण अण्णा हंबर्डे,मा.आ. अविनाश घाटे,मा.आ.सुभाष साबणे,जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्यासह जिल्हयातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी भोकर तालुक्यातील सर्व पदाधिकारी,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन,संचालक,सरपंच,उपसरपंच व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन तालुकाध्यक्ष सुर्यकांत बिल्लेवाड, शेख जवाजोद्दीन बरबडेकर यांसह आदींनी केले आहे.




