Uncategorizedआपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडासामाजिक

भोकर येथील अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती अध्यक्ष पदी नागोराव शेंडगे

तर उपाध्यक्ष पदी शंकर डांगरे व सचिव सुशिलकुमार शिंदे पदीयांची निवड

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : राजमाता-राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती महोत्सव समिती अध्यक्षपदी जेष्ठ समाज सेवक तथा ओबीसी नेते नागोराव शेंडगे यांची,उपाध्यक्ष पदी म्हणून शंकरराव डांगरे,अवधुत पा.ईळेगावकर,सर्जेराव शिंदे,तर सचिव पदी सुशीलकुमार शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

स्व.डॉ.शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात दि.२१ मे २०२६ रोजी व्हाइस ऑफ मिडीया (ग्रामीण)नांदेड चे जिल्हाध्यक्ष तथा उबाठा शिवसेनेचे नेते सुभाषराव नाईक किनीकर यांच्या अध्यक्षतेखाली भोकर तालुक्यातील धनगर समाज बांधवांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत ३१ मे २०२६ राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी करण्यात येईल असे ठरले.तसेच हा जयंती सोहळा मोठ्या आनंदोत्सवात साजरा करण्यासाठी जयंती सोहळा समिती गठीत करण्यात आली.या समितीच्या अध्यक्ष पदी जेष्ठ सामाजिक नेते नागोराव शेंडगे,तर उपाध्यक्ष पदी- शंकर डांगरे,अवधुत पा.ईळेगावकर,सर्जेराव शिंदे थेरबनकर व सचीव- सुशीलकुमार शिंदे देवठाणकर,सहसचिव पदी देवबा शिळेकर व मुख्य संघटक म्हणून नागोराव पा.बिरगाळे, राजेश हाके,सहसंघटक पदी खंडोजी गोरे,कोषाध्यक्ष पदी निलेश चिकाळकर,निमंत्रक -प्रा.बालाजी वरवटे, बळीराम माने,तसेच कार्याध्यक्ष-बालाजी हेगडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.बैठक समोरापाअंती सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच सर्व जयंती मंडळ पदाधिकाऱ्यांचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close