भोकर सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मुकूंद हुंडेकर यांची निवड
बिनविरोध निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून होत आहे अभिनंदन!


अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन माधव भुजंगराव देशमुख यांचे अल्पश: आजाराने अकाली दुर्दैवी निधन झाले.यामुळे सदरील पद रिक्त होते.या रिक्त पदासाठी सर्व संचालकांनी दि.२८ ऑक्टोबर २०२५ रोजी निवडणूक निर्वाचन अधिकारी श्रीमती महाबळे यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक घेऊन चेअरमन पदी मुकूंद हुंडेकर यांची बिनविरोध निवडणूक केली आहे.
भोकर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन स्व.भुजंगराव देशमुख यांनी अनेक वर्षे भुषविले.त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे चिरंजीव माधव भुजंगराव देशमुख यांची चेअरमन पदी निवड करण्यात आली होती.परंतू त्यांचे देखील अल्पश: आजाराने अकाली निधन झाले.यामुळे चेअरमन पदाची जागा रिक्त होती.या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्याचा सर्व संचालकांनी निर्णय घेतला.याच अनुषंगाने दि.२८ ऑक्टोबर २०२५ रोजी सेवा सोसायटीत निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती महाबळे यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.यावेळी नागनाथ लक्ष्मणराव घिसेवाड,गोविंद बाबागौड पाटील,मुकूंद रामराम हुंडेकर,सुभाष पाटील किन्हाळकर,सतीश रामराव देशमुख, श्याम जैन,गोविंद जगदेवराव देशमुख,मोईन पटेल, सावित्रीबाई बंडोड दत्तात्रेय अनारवाड,गणेश देशमुख यांसह एकूण १२ संचालकांची उपस्थिती होती.या सर्वांच्या उपस्थितीत मुकूंद हुंडेकर यांचा चेअरमन पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला.या अर्जाचे सुचक संचालक गोविंद बाबागौड पाटील हे होते तर अनुमोदक संचालक नागनाथ घिसेवाड हे होते.या पदासाठी मुकूंद हुंडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे चेअरमन पदी त्यांचघ बिनविरोध निवड करण्यात आली.ही निवड बिनविरोध झाल्यामुळे उपस्थित सर्व संचालकांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.





