आपलं नांदेडनांदेड जिल्हानोकरी संदर्भभोकरमराठवाडासामाजिक

भोकर पंचायत समिती अंतर्गत आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी ७ जणांचे प्रस्ताव सादर

लवकरच होणार आहेत हे पुरस्कार घोषित...

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर पंचायत समिती अंतर्गत काही गावांच्या विकास कामांत मोलाचा वाटा असणाऱ्या ७ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सन २०१८ ते २०२५ दरम्यानचे ‘आदर्श ग्रासेवक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यासाठी गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पं) यांच्याकडे दि.११ नोव्हेंबर रोजी प्रस्ताव पाठविले असून लवकरच सदरील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांनी दिली आहे.

शासन निर्णयातील तरतुदीनुसार पंचायत समिती भोकर अंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे ‘आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे’ प्रस्ताव विहीत नमुन्यात सादर करण्यात आले आहेत.त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची नावे व कार्यकालाप्रमाणे पुरस्कारासाठीचे वर्ष पुढील प्रमाणे आहे.माधव झोटींगा मुसळे(सन २०२८- १९),बालाजी दत्तात्रय कनोजवार(सन २०१९-२०), बालाजी माधवराव इंगळे(सन २०२०-२१),ज्ञानेश्वर चंद्रकांत कल्याणे (सन २०२१-२२),श्रीमती माधवी मनोहर जाधव( सन २०२२-२३),शैलेश बालाजी काळे(सन २०२३-२४) व श्रीमती वर्षा चांदोबाराव डोईवाडे(सन २०२४-२५) उपरोक्त ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या नावाचे प्रस्ताव पुरस्कारासाठी पाठविण्यात आले असून निवड ही लवकरच होणार असल्याची माहिती भोकर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माधव केंद्रे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close