राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धेत भोकर च्या दोन खेळाडू ठरल्या सुवर्ण पदकाच्या मानकरी
टार्गेट स्पोर्ट्स अकॅडमी भोकर तथा क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या आहेत या दोघी

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : ओडीसा राज्यातील भुवनेश्वर येथे दि.२४ ते २९ मे २०२६ रोजी राष्ट्रीय सब ज्युनिअर बेसबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत सहभागी झालेल्या भोकर येथील कु.नेहा मोहनाजी ताटेवाड व कु.श्वेता शिवाजी जाधव यांनी आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करत राज्य संघाला दोन सुवर्ण पदके मिळवून दिले.टार्गेट स्पोर्ट्स अकॅडमी भोकर तथा क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या या दोघी सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्याने त्यांचे क्रीडा क्षेत्रासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
बेसबॉल फेडरेशन ऑफ इंडिया च्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३१ वी सब ज्युनियर राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धा ओडीसा राज्यातील भुवनेश्वर येथे दि.२४ ते २९ मे २०२६ रोजी दरम्यान संपन्न झाली.या स्पर्धेत देशातील विविध राज्याच्या संघांनी सहभाग घेतला होता.यात महाराष्ट्र राज्याच्या मुलींचा संघ सहभागी झाला होता.या महाराष्ट्र राज्य बेसबॉल मुलींच्या संघात टार्गेट स्पोर्ट्स अकॅडमी भोकर तथा क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित झालेल्या भोकर तालुक्यातील कु.नेहा ताटेवाड व कु.श्वेता जाधव यांचा समावेश होता. या दोघींनी महाराष्ट्र राज्य संघाचे नेतृत्व केले,तसेच आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करत संघाला विजयश्री मिळवून दिली.नव्हे तर देश भरातून आलेल्या संघांना मागे टाकत विजयश्रीचा प्रथम क्रमांक मिळवून दिला.संघास सुवर्ण पदक प्राप्त करुन दिले व स्वतः ही सुवर्ण पदकाच्या त्या दोघी मानकरी ठरल्या.
भोकर येथील मंजुळाबाई किन्हाळकर मुलींची शाळा येथे इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत असलेली कु.नेहा ताटेवाड व श्री शाहू महाराज विद्यालयात भोकर येथे इयत्ता ८ वीत शिक्षण घेत असलेली कु.श्वेता जाधव या दोघी गेल्या काही वर्षांपासून टार्गेट स्पोर्ट्स अकॅडमी भोकर तथा क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुळाबाई किन्हाळकर याळेच्या प्रांगणात प्रशिक्षण घेत आहेत.जिद्द,चिकाटी व परिश्रम याचा मेळ घालत या दोघींनी ही तालुका,जिल्हा व राज्य पातळीवरील स्पर्धेत सहभाग घेऊन अनेक पदके मिळविली आहेत.तसेच आपल्या टार्गेट स्पोर्ट्स अकॅडमी भोकर तथा क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर,त्यांचे पालक व शाळेचे नावलौकिक उज्वल केले आहे.काही दिवसांपूर्वी त्यांची महाराष्ट्र राज्य मुलींच्या संघात निवड झाली होती.त्यामुळे खेळाच्या सरावात त्यांनी सातत्य ठेवले होते.त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत ओडीसा राज्याच्या भुवनेश्वर येथील किट्स युनिव्हरसिटी मैदानावर संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन केले.तसेच महाराष्ट्र राज्य संघाला व स्वतः ला ही सुवर्ण पदक मिळवून दिले.त्यामुळे या दोघी व त्यांचे प्रशिक्षक हे अभिनंदन आणि कौतुकाचे मानकरी ठरले. महाराष्ट्र राज्य संघाला हा बहुमान मिळवून दिल्यामुळे त्यांचे क्रीडाक्षेत्रासह अनेकांतून अभिनंदन होत आहे.

त्या मिळविलेल्या या ऐतिहासिक यशाबद्दल नांदेड जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, शाळा संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री माधवराव पाटील किन्हाळकर,मुख्याध्यापिका सौ.एस.एन.पाटील,श्री शाहू महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सांवत देशमुख, क्रीडा शिक्षक व्ही.जी कुमरे व सलीम शेख,दोन्ही शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन चे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा संपादक उत्तम बाबळे,तेंग सु डो असोसिएशन नांदेड चे उपाध्यक्ष सुधांशू कांबळे,भोकर येथील विनोद सर्स क्लासेस भोकर चे संचालक विनोद श्रीखंडे,बेसबॉल असोसिएशनचे जिल्हा सचिव आनंदा कांबळे,महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष इंद्रजीत नितनवार,महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे महासचिव राजेंद्र ईखणकर,महाराष्ट्र बेसबॉल सरचिटणीस अशोक सरोदे, बेसबॉल पंच तथा ऑल इंडिया बेसबॉल प्लेयर कु.सलोनी व्ही.सुरदसे,राष्ट्रीय स्वर्णपदक विजेती खेळाडू कु.राणी जाधव व शालेय राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धेतील कास्यपदक प्राप्त खेळाडू कु.सुदा शिंदे,महिला महाराष्ट्र कोच कु.आरती भगत,यांसह आदींनी या दोघींचे ही हार्दिक अभिनंदन केले असून पुढील यशासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.




