आपलं नांदेडक्रीडानांदेड जिल्हामराठवाडाराज्य

राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धेत कु.शर्वरी वाढवणे ही खेळाडू ठरली सुवर्ण पदकाची मानकरी

अरुणोदय पब्लिक स्कूल ठाणे,मुंबई ची आहे ही गुणसंपन्न बेसबॉल खेळाडू विद्यार्थीनी

अंबुज प्रहार प्रतिनिधी
ठाणे : ओडीसा राज्यातील भुवनेश्वर येथे दि.२४ ते २९ मे २०२६ रोजी दरम्यान राष्ट्रीय सब ज्युनिअर बेसबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत सहभागी झालेली अरुणोदय पब्लिक स्कूल ठाणे, मुंबई ची विद्यार्थीनी कु.शर्वरी वाढवणे या बेसबॉल खेळाडूने आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करत महाराष्ट्र राज्याच्या संघाला विजयश्री प्राप्त करून देत सुवर्ण पदक मिळविले आहे.राज्य संघाला विजयश्री व स्वतः ही सुवर्ण पदकाची ती मानकरी ठरल्याने तिचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
बेसबॉल फेडरेशन ऑफ इंडिया च्या विद्यमाने आयोजित ३१ वी सब ज्युनियर राष्ट्रीय बेसबॉल क्रीडा स्पर्धा ओडीसा राज्यातील भुवनेश्वर येथे दि.२४ ते २९ मे २०२६ रोजी दरम्यान संपन्न झाली.या स्पर्धेत देशातील विविध राज्याच्या संघांनी सहभाग घेतला होता.यात महाराष्ट्र राज्याच्या मुलींचा संघ सहभागी झाला होता.या महाराष्ट्र राज्य बेसबॉल मुलींच्या संघात अरुणोदय पब्लिक स्कूल ठाणे, मुंबई येथे इयत्ता ९ वीत शिक्षण घेत असलेली गुणसंपन्न खेळाडू विद्यार्थीनी कु.शर्वरी सचिन वाढवणे चा समावेश होता.महाराष्ट्र राज्य बेसबॉल मुलींच्या संघाचे प्रतिनिधित्व करत तिने आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन केले व जीवाची बाजी लावून संघाला विजयश्री मिळवून दिली.नव्हे तर देश भरातून आलेल्या संघांना मागे टाकत विजयश्रीचा प्रथम क्रमांक मिळवून दिला व संघास सुवर्ण पदक प्राप्त करुन दिले आणि स्वतः ही सुवर्ण पदकाची ती मानकरी ठरली आहे.
अरुणोदय पब्लिक स्कूल ठाणे येथील क्रीडा प्रशिक्षक निखिल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कु.शर्वरी वाढवणे ने बेसबॉल व अन्य खेळांचे प्रशिक्षण घेतले आहे.अगदी लहान वयापासूनच तिला विविध क्रीडा क्षेत्रात खेळण्याची आवड असल्यामुळे तिची आई सौ.रेश्मा वाढवणे व वडील सचिन वाढवणे यांनी प्रशिक्षण घेण्यासाठी तिळा पाठबळ देत प्रोत्साहित केले आहे.या अगोदर तिने जिल्हा व राज्य पातळीवरील विविध स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिके आणि पदके प्राप्त केली आहेत.तसेच शिर्डी येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत सहभागी होऊन तिने खेळाचे उत्तम प्रदर्शन केले आहे.तिच्या खेळाची उत्तम प्रदर्शनी पाहुनच काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य बेसबॉल मुलींच्या संघात तिची निवड झाली होती.शाळेचे क्रीडा प्रशिक्षक निखिल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सातत्यपूर्ण अथक परिश्रम घेऊन सराव केला आहे.या सरावाच्या बळावरच महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत ओडीसा राज्याच्या भुवनेश्वर येथील किट्स युनिव्हरसिटी मैदानावर संपन्न झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत तिने खेळाचे उत्तम प्रदर्शन केले आहे.तसेच महाराष्ट्र राज्य संघाला व स्वतः ला ही सुवर्ण पदक प्राप्त करुन घेतले आहे.त्यामुळे अभिनंदन आणि कौतुकाची ती मानकरी ठरली आहे.यातून तिने आपले पालक,शाळेचे,जिल्ह्याचे व राज्याचे नाव लौकीक उज्वल केले आहे.त्यामुळे तिचे क्रीडाक्षेत्रासह अनेकांतून अभिनंदन होत आहे.
तिने मिळविलेल्या या ऐतिहासिक यशाबद्दल ठाणे जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी,शाळेचे मुख्याध्यापक एलिस स्वामी,क्रीडा प्रशिक्षक निखिल गावडे,दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे नांदेड जिल्हाध्यक्ष उत्तम बाबळे,टार्गेट स्पोर्ट्स अकॅडमी भोकर चे क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर,राष्ट्रीय खेळाडू तथा पंच कु.सलोनी सुरदसे यांसह आदींनी तिचे अभिनंदन केले असून पुढील यशासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close