आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडासामाजिक

भोकर येथे सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने श्रीमद् भागवत कथा व कीर्तनाचे आयोजन

दि.१८ ते २५ सप्टेंबर दरम्यान होणार धार्मिक कार्यक्रम

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने 18 ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान श्रीमद् भागवत कथा व कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून कथा प्रवक्ते राष्ट्रीय कथाकार ह.भ.प.शिवाजी महाराज वटंबे हे राहणार आहेत,महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने देखील होणार आहेत.

भोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळाला ७८ वर्षाची परंपरा असून दरवर्षी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात चालू वर्षी १८ ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान श्रीमद् भागवत कथा व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे दुपारी २:०० ते ५:०० या वेळामध्ये राष्ट्रीय कथाकार भागवताचार्य ह.भ.प.शिवाजी महाराज वटंबे यांच्या ओजस्वी वाणीतून कथा श्रवणास मिळणार आहे.रात्री ८:३० ते १०:३० या वेळामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार यांची कीर्तने होणार आहेत.दि.१८ सप्टेंबर रोजी ह.भ.प.भागवताचार्य आस्थादीदी सेनगावकर,दि.१९ सप्टेंबर रोजी भागवताचार्य ह.भ.प. महंत प्रभाकर बाबा कपाटे भोकर,दि.२० रोजी ह.भ.प.सुनील महाराज लांजुळकर( ग्रामगीता मर्मज्ञ)देवरी जि. अकोला,दि.२१ सप्टेंबर रोजी ह.भ.प.सुरेश महाराज पोफाळीकर,दि.२२ सप्टेंबर रोजी ह.भ.प.मुक्ताई महाराज वेरूळकर.व ह.भ.प.शिवानी ताई महाराज चाळक यांचे भन्नाट जुगलबंदी कीर्तन,दि.२३ रोजी ह.भ. प.कांचनताई जगताप निवृत्तीनाथ समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर,दि.२४ सप्टेंबर रोजी ह.भ.प.रुपालीताई सवणे परतुरकर झी टॉकीज फेम कीर्तनकार,दि.२५ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वा. ह.भ.प.भागवताचार्य शिवाजी महाराज वटंबे यांचे काल्याचे किर्तन त्यानंतर दुपारी १:०० वाजता महाप्रसाद होईल.
दि.२१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० या वेळामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे दररोज सायंकाळी ६:३० ते ७:३० या वेळेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची सामुदायिक प्रार्थना व भजन होईल या सर्व धार्मिक सोहळ्याचा परिसरातील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close