Uncategorizedआपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकियराज्यसामाजिक

राज्य सरकारने डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा केला उचित सन्मान…

१ ऑगस्ट जयंती दिवस हा 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून साजरा होणार!

अंबुज प्रहार प्रतिनिधी
मुंबई : विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या विश्वव्यापी लोककल्याणकारी साहित्य संपदेची राज्य सरकारने दखल घेतली असून यथोचित सन्मान करण्याच्या उदात्त हेतूने त्यांचा जन्मदिवस १ ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच याविषयीचा अध्यादेश पारित करण्यात आला असून यावर्षी पासून राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये व संस्थांमध्ये विविध साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

वाटेगाव ता.वाळवा जि.सांगलीचे थोर सुपुत्र तुकाराम भाऊराव साठे उर्फ विश्व साहित्य भुषण साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांनी शाळेच्या चार भिंतीच्या खोलीत बसून काळ्या फळ्यावरील खडूने गिरविलेले चार अक्षरे कधी ही पाहिली नाहीत.परंतू प्रतिकुल परिस्थितीवर मात करत वृत्तपत्रांची रद्दी, दुकानाच्या नावांच्या पाट्या,सिनेमांच्या पोस्टर वरील अक्षरे ज्ञात करत अनुभवाच्या कर्तव्यशाळेतून ती अक्षरे गिरवित अक्षर साहित्याचे शिरोमणी होण्यापर्यंतचा खडतर प्रवास केला व प्रतिभेचा हिमालय होऊन विश्व साहित्याच्या पटलावर आपल्या साहित्याचे उत्तुंग शिखर उभे केले.त्यांचा या खडतर तथा प्रेरणादायी लेखणीची,लिखाणाची व साहित्यिक जीवन प्रवासी दखल जगाने घेतली आहे.त्यांची साहित्य संपदा ही अमुल्य ठेवा असून ती प्रेरणादायी, उर्जादायी,जीवनदायी व लोककल्याणकारी असल्यामुळेच जगातील अनेक भाषेत ती साहित्य संपदा अनुवादित करण्याण्यात आली आहे.या प्रतिभेच्या हिमालयाच्या साहित्य संपदेतून वंचित,शोषित,पीडित,कष्टकरी,कामगार, शेतकरी,व्यापारी,दीन दलितांचे दु:ख जगासमोर आलेले आहे.त्यामुळेच त्यांच्या साहित्य संपदेचा अभ्यास महाराष्ट्र, भारत देशच नव्हे तर जागतिक पातळीवर केला जात आहे. हा थोर साहित्यीक भले ही कोणत्या शाळेत,महाविद्यालयात गेला नाही,परंतू त्यांच्या साहित्यावर अनेक विद्यापीठांतून शेकडो विद्यार्थी विद्या वाचस्पती (पीएचडी) होत आहेत. म्हणूनच शाळा,महाविद्यालय व विद्यापीठांतून त्यांच्या लेखणीचे व उतुंग क्षमतेच्या लिखाणाचे स्मरण होणे गरजेचे आहे. साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा व त्यांच्या साहित्य संपदेचा यथोचित सन्मान व्हावा व त्यांच्या लोककल्याणकारी कार्याला अभिवादन करता यावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वचा निर्णय घेतला असून यापुढे आता दरवर्षी त्यांचा जन्मदिवस १ ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दि.२९ जुलै २०२६ रोजी राज्य सरकारच्या सुचनेनुसार अध्यादेश काढला आहे. तसेच डॉ.अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून मराठी साहित्य समृद्ध केले आहे.त्यांच्या साहित्यिक वारशाचे स्मरण व्हावे,नव्या पिढीला लेखनाची प्रेरणा मिळावी आणि समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांनी लेखनाकडे वळावे,या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने त्यात स्पष्ट केले आहे.राज्य सरकारच्या या निर्णयानुसार यावर्षी पासून,उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये १ ऑगस्ट रोजी ‘लेखन प्रेरणा दिन’ विविध साहित्यिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास,लेखनाची प्रेरणा आणि नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे ही शासनाने त्यात स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्याचे सुचविण्यात आले आहे. ‘लेखन प्रेरणा दिना’ निमित्त राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये व संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कविता,कथा आणि निबंध लेखन स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. तसेच वक्तृत्व,वादविवाद स्पर्धा,स्थानिक साहित्यिकांच्या मुलाखती,व्याख्याने आणि ग्रंथदिंडीसारखे उपक्रमही राबविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे वाचन आणि चर्चासत्रांचे आयोजन करावे विद्यार्थ्यांनी डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णन,लोकनाट्य,पोवाडे आणि शाहिरी साहित्याचे वाचन करावे.त्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि साहित्यिक योगदानावर व्याख्याने,चर्चासत्रे,परिसंवाद,कार्यशाळा तसेच साहित्य संमेलनांचे आयोजन करण्याचे निर्देशही परिपत्रकात देण्यात आले आहेत.

सर्व विद्यापीठांना शासनाच्या महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उच्च शिक्षण,तंत्र शिक्षण आणि कला संचालनालयांनी आपल्या अधिपत्याखालील सर्व विद्यापीठे,महाविद्यालये आणि संस्थांना १ ऑगस्ट रोजी ‘लेखन प्रेरणा दिन’ साजरा करण्याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात,असेही शासनाने परिपत्रकात नमूद केले आहे.तसेच डॉ.अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या साहित्यिक वारशाचे स्मरण व्हावे,नव्या पिढीला लेखनाची प्रेरणा मिळावी आणि समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांनी लेखनाकडे वळावे,या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे,असे ही शासनाने स्पष्ट केले आहे. डॉ.अण्णा भाऊ साठे यांची लेखणी ही वंचित,शोषित, कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसाच्या वेदना,संघर्ष आणि स्वाभिमानाचा बुलंद आवाज आहे.त्यांनी साहित्याला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनविलेले आहे. याची दखल घेऊन त्याचा आगळा वेगळा व उचित सन्मान केला जावा यासाठी यावर्षीपासून त्यांच्या जन्मदिवस  १ ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याची मान्यता मिळणे म्हणजे परिवर्तनवादी साहित्याचा आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा गौरव आहे.तसेच हा निर्णय राज्यातील विद्यार्थी,शिक्षक,संशोधक आणि नवोदित लेखकांना वाचन,लेखन,चिंतन आणि समाजप्रबोधनाची नवी प्रेरणा देणारा करणार आहे.हा निर्णय घेण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची महत्त्वपूर्ण भुमिका आहे. त्यामुळे त्यांचे व राज्य सरकारचे साहित्यिक,डॉ.अण्णा भाऊ साठे प्रेमी,विचार अनुयायी व समाज बांधवांतून अभिनंदनासह ऋण व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close