आपलं नांदेडआरोग्यनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकियसामाजिक

डॉ.भाले दांपत्यांचा आरोग्य सेवेतील सेवाभाव कौतुकास्पद-भगवान दंडवे

डॉ.रामेश्वर भाले यांनी राजकारणात येऊ नये,कारण येथे आलेला माणूस बिघडून जातो-माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर यांच्या पोटातील खदखद ओठावर आली...

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : डॉ.भाले दांपत्यांचा उद्देश पैसा कमावणे नसून समाजासाठी झिजणे आहे.त्यांच्या सेवाभावामुळे भोकरच्या जनतेला एक उत्तम आरोग्यसेवेचा पर्याय मिळाला आहे. त्यांचा आरोग्य सेवेतील सेवाभाव कौतुकास्पद आहे,असे गौरवोद्गार भाजपा चे भोकर विधानसभा समन्वयक भगवान दंडवे यांनी व्यक्त केले.ते माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ.भाले दांपत्यांच्या संजीवनी जनरल अँड मॅटरनिटी हॉस्पिटल,भोकर वतीने आयोजित मोफत गरोदर मातांची आरोग्य तपासणी,सोनोग्राफी व औषधोपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ.भाले दांपत्यांच्या संजीवनी जनरल अँड मॅटरनिटी हॉस्पिटल,भोकर च्या वतीने दि.२८ ऑक्टोबर २०२५ रोजी मोफत गरोदर मातांची तपासणी, सोनोग्राफी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून भाजपाचे भोकर विधानसभा समन्वयक भगवान दंडवे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर,महंत उत्तम बन महाराज(कैलास गड, भोकर),भाजपा भोकर तालुकाध्यक्ष दिवाकर रेड्डी सुरकुंठवार,सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपनगराध्यक्षांचे प्रतिनिधी शेख युसूफ,भाजपा महिला पदाधिकारी कल्पना भोसले,दिलीप सोनवाडे,पत्रकार विठ्ठल फुलारी,सेवा समर्पण चे अध्यक्ष दिगंबर देशमुख,गौतम कसबे,विठ्ठल कुमरे यांसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
शिबिराचा प्रारंभ भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाला.तर शिबिराचे आयोजन करण्याची पार्श्वभूमी सदरील हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.सौ.मनिषा भाले यांनी प्रास्ताविकातून विषद केली.यातून त्या म्हणाल्या की,खा.अशोकराव चव्हाण यांनी आवाहन केले होते की वाढदिवसानिमित्त हारतुरे,मोठा सत्कार न करता जनसेवी व लोकोपयोगी उपक्रमातून वाढदिवस साजरा करावा.राज्यात अतिवृष्टीमुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकोपयोगी उपक्रमांतून सर्वसामान्यांना मदत करता आली पाहिजे.याच उदात्त हेतूने आम्ही या शिबिरातून समाजाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.यातून आम्हाला खरे समाधान मिळत आहे.तर उद्घाटक म्हणून बोलतांना भगवान दंडवे पुढे म्हणाले की,डॉ.भाले दांपत्य हे या शिबिरातूनच नव्हे प्रतिदिन हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णास त्याच सेवाभातून समाधानकारक उपचार देतात.त्याची उपचार पद्धती ही पैसे कमविण्यास प्राधान्य देणारी नसून माणूसकी व मानवसेवा जपणारी आहे. यामुळेच संजीवनी हॉस्पिटल हे गोरगरीब जनतेचे आरोग्यदायी आधारस्थान बनले असून पैशासाठी नव्हे तर समाजासाठी झिजणारे असल्याने डॉ.भाले दांपत्य आज प्रत्येकाच्या मनात आपले स्थान निर्माण करत आहे,असे ही ते म्हणाले.सदरील आरोग्य शिबिरात डॉ.रामेश्वर भाले,डॉ. सौ.मनिषा भाले,डॉ.सचिन भाले व डॉ.सौ.अश्विनी भाले अर्थातच या डॉ.भाले दांपत्यांनी असंख्य महिलांची तपासणी करुन औषोधोपचार ही केला.उत्स्फुर्त प्रतिसाद मिळालेल्या या शिबिराची सांगता राष्ट्रगिताने झाली.तर हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ही अथक परिश्रम घेतले.

डॉ.रामेश्वर भाले यांनी राजकारणात येऊ नये,कारण येथे आलेला माणूस बिघडून जातो-माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर…
सदरील शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी भोकर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार भगवान दंडवे व विनोद चिंचाळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.तर इच्छुकांच्या यादीत डॉ.रामेश्वर भाले यांचे नाव ही पुढे येत आहे.त्यामुळे स्पर्धकांच्या यादीत डॉ.रामेश्वर भाले यांची भर पडल्याने एक नवा स्पर्धक निर्माण झाल्याच्या अडचणीची खदखद प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर यांच्या ओठी आली.ते म्हणाले की,खा.अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा दिली आहे.ते दूरदृष्टीचे नेतृत्व आहेत.त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेकजण काम करु इच्छितात. डॉ.रामेश्वर भाले हे देखील करु इच्छितात.परंतू त्यांना माझा एक सल्ला आहे की,तुम्ही इकडेच चांगले आहात, इकडेच रहून आरोग्य सेवाच करा व राजकारणात पडू नका,कारण राजकारणात आलेला माणूस बिघडून जातो.तुमचं कार्य सेवाभावी आहे.राजकारणी लोकात वेळेनुसार बदल होत जातो,तुम्ही ही बदलून जाल, त्यामुळे तुम्ही उत्तम प्रकारे आरोग्य सेवाच करा,इकडे येऊ नका.राजकारणातला माणूस सेवाभाव विसरुन जातो व बिघडूनही जातो हा स्वअनुभव विनोद चिंचाळकर यांनी यावेळी व्यक्त केल्याने पोटातली खदखद ओठी आल्याचे निदर्शनास आले.तसेच त्यांनी डॉ.रामेश्वर भाले यांना हा स्वअनुभवी सल्ला दिला आहे का स्पर्धकापुढे ‘गतीरोधक’ लावला आहे ? यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेतील डॉ.रामेश्वर भाले यांना उमेदवारी मिळण्या अगोदरच त्यांचा पत्ता कट करण्याचा कट त्यांनी रचला आहे काय ? अशी चर्चा यावेळी उपस्थितांतून ऐकावयास मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close