आपलं नांदेडआरोग्यनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराजकियसामाजिक

ग्रामीण रुग्णालय भोकर येथे ‘स्वस्थ नारी,सशक्त परिवार’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिर संपन्न

भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला हा कार्यक्रम...

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यात केंद्र शासन व राज्य शासन सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबवित असून याच अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने सूचित केल्या नुसार माता आणि बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी ‘स्वस्थ नारी,सशक्त परिवार’ अभियानांतर्गत शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आयोजित आरोग्य शिबीर मोठ्या प्रतिसादाने संपन्न झाले आहे.यावेळी भाजपाचे पदाधिकारी व आरोग्य विभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख,निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ.राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली व शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रताप चव्हाण,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदेश जाधव यांच्या नियोजनातून दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे ‘स्वस्थ नारी,सशक्त परिवार’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिर संपन्न झाले.यावेळी भाजपाचे विधानसभा समन्वयक भगवानराव दंडवे हे अध्यक्षस्थानी होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे भोकर तालुकाध्यक्ष दिवाकर रेड्डी सुरकूंटवार,भोकर शहराध्यक्ष विशाल माने,खाजगी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.फेरोज इनामदार,माजी अध्यक्ष डॉ.राम नाईक, रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ.साईनाथ वाघमारे,वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रताप चव्हाण,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश जाधव,डॉ.मनोज पांचाळ,भोकर केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन भोकर चे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड, भाजपा अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्ष मिर्झा ताहेर बेग,नांदेड येथील विशेष तज्ञ डॉ.अर्चना निलमवार (नेत्ररोग), डॉ.ठक्कवाड (मानसिक आरोग्य तज्ञ),डॉ.मुनेश्वर (स्त्रीरोग तज्ञ),यांसह भाजपाचे पदाधिकारी व आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पुजन व दिप प्रज्वलन करण्यात येऊन शिबिराचा आरंभ करण्यात आला. यानंतर दंत शल्य चिकित्सक डॉ.मायादेवी नरवाडे यांनी अवयव दानाची प्रतिज्ञा वाचन केली व सर्व उपस्थितांनी अवयव दान प्रतिज्ञा घेतली.तर या आरोग्य शिबिरात महिलांचे रक्तदाब,मधुमेह, दंत रोग,नेत्र रोग,स्तन व गर्भाशय,मुख व मुख कर्क रोग तपासणी,गरोदर महिलांसाठी लसीकरण सेवा,सोनोग्राफी, हिमोग्लोबिन तपासणी,क्षय रोग तपासणी,सिकलसेल आजार,रक्तक्षय तपासणी,पोषण आहार मार्गदर्शन,मानसिक आरोग्य मार्गदर्शन,आयुष्यमान कार्ड,आभा कार्ड काढणे, अवयवदान नोंदणी,रक्तदान शिबीर,लहान बालकांची तपासणी विशेष तज्ञ डॉक्टर यांच्या कडून तपासणी करण्यात आली.
क्षयरुग्ण यांना पोष्टिक आहार किट चे मान्यवर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ह्रदय शस्त्रक्रिया झालेल्या बालकांचा व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.आयोजित रक्तदान शिबीरात अधिपरिचारिका श्रीमती जिजा भवरे यांसह एकूण १६ दात्यांनी रक्तदान केले.सदरील आरोग्य शिबिरात नोंदणी झालेल्या एकूण ३९० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.सदरील ‘स्वस्थ नारी,सशक्त परिवार’ अभियानांतर्गत संपन्न झालेल्या आरोग्य शिबिराविषयीची सविस्तर अशी माहिती नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी डॉ.अस्मिता भालके यांनी प्रास्ताविकातून दिली. तर सुत्रसंचालन डॉ.विजया किनीकर व सत्यजीत टिप्रेसवार यांनी केले.आणि उपस्थितीतांचे आभार डॉ.शिल्पा कळसकर यांनी मानले.भोकर शहर व तालुक्यातील बालक, किशोरी व महिलांनी बहुसंख्येने या शिबिराचा लाभ घेतला व हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथील सर्व वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी, क्षयरोग कर्मचारी,अंगणवाडी सेविका,मदतनीस,राम रतन नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनी यांसह आदिंनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close