आपलं नांदेडआरोग्यनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाराज्यसामाजिक

‘थिंक हेल्थ,थिंक फार्मासिस्ट!’ थीमने औषधी वाटपातून भोकर केमिस्ट असोसिएशनने केला फार्मासिस्ट दिन साजरा

आठवड्यातील किमान दोन दिवस ॲप्रॉन परिधान करून औषधी वितरणाचे कर्तव्य बजावण्याचा केला संकल्प...

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : आरोग्य व्यवस्था अखंड चालू ठेवणारे फार्मासिस्ट हे केवळ औषधे देणारेच नाहीत,तर प्रत्येक रुग्णाचे आरोग्य मार्गदर्शक ही आहेत.यामुळेच त्यांच्या कर्तव्य प्रणालीस ‘थिंक हेल्थ,थिंक फार्फासिस्ट!’ असे संबोधले जाते.याच थिमच्या माध्यमातून दि.२५ सप्टेंबर रोजी भोकर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने भोकर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना आवश्यक त्या औषधी व फळाचे वाटप करुन जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा केला आहे.
देशभरातील सर्व फार्मासिस्टनी जीएसटी २.० सारख्या बदलांना स्विकारुन नव्हे तर प्रसंगी स्वतःचे नुकसान सहन करूनही आरोग्य व्यवस्था अखंड चालू ठेवलेली आहे. त्यामुळे फार्मासिस्ट हे केवळ औषधे देणारेच नाहीत,तर प्रत्येक रुग्णाचे आरोग्य मार्गदर्शक ही आहेत.यामुळेच त्यांच्या कर्तव्य प्रणालीस ‘थिंक हेल्थ,थिंक फार्फासिस्ट !’असे संबोधले जाते.याच थिमच्या माध्यमातून दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी फार्मासिस्टची ओळख असलेला पांढऱ्या रंगाचा ॲप्रॉन परिधान करून शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथे रुग्णांना आवश्यक ती औषधी व फळांचे वाटप करुन भोकर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने ‘जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भोकर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड, विजयकुमार मारुडवाड,गजानन अडकिणे, योगेश पद्मावार, साईनाथ गाढे,रामेश्वर कापावर,संतोष नरवाडे,ईश्वर जाधव, गंगाधर रातोळे यांसह आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. तर सदरील उपक्रमादरम्यान शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिक्षक,अधिपरिचारीका,आरोग्य कर्मचारी व रुग्णांची बहुसंख्येने उपस्थिती होती.तसेच विशेष बाब म्हणजे या दिवसापासून आजपासून भोकर येथील सर्व फार्मासिस्ट आठवड्यातील किमान दोन दिवस ॲप्रॉन परिधान करून औषधी वितरणाचे कर्तव्य बजावणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close