Uncategorized

भोकर ग्रामीण रुग्णालयातील अधिपरिचारिकेने मुलीच्या वाढदिवसानिमित्त क्षयरुग्णांना वाटप केले फुडबास्केट

अनाठायी खर्च टाळून जपला सेवाभाव...

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भोकर ग्रामीण रुग्णालयातील अधिपरिचारिका तथा आरोग्य सेवेतील कर्तव्यदक्ष कर्मचारी श्रीमती ज्योती शेंडगे यांनी त्यांची मुलगी कु.श्रीषा हिच्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च टाळून दि.६ नोव्हेंबर २०२५ रोजी क्षय रुग्णांना फुड बास्केटचे वाटप केले आहे.क्षय मुक्त भारत अभियान संपूर्ण देशात चालू असतांना त्यांनी हा सेवाभावी उपक्रम राबविला असल्याने त्यांचे आरोग्य क्षेत्रासह अनेकांनी कौतुक केले आहे.
यावेळी भोकर ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रताप चव्हाण,वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळासाहेब बिऱ्हाडे,डॉ.अस्मिता भालके,इन्चार्ज सिस्टर उज्वला पवार, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रसवार,औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे,क्षयरोग कर्मचारी विजय क्षीरसागर,संतोष थळपते,हत्तीरोग आरोग्य निरीक्षक व्यंकटेश पुलकंठवार,ग्रामीण रुग्णालय कर्मचारी,हत्तीरोग कर्मचारी,आशा कर्मचारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close