आपलं नांदेडनांदेड जिल्हाभोकरमराठवाडाशेत शिवार

साथी पोर्टल फेज-२ च्या विरोधात भोकर फर्टिलायझर्स सीड्स डीलर्स असोसिएशनने ठेवले दुकाने बंद

भोकर येथील कृषि दुकाने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद...

अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : महाराष्ट्र फर्टिलायझर्स सीड्स डीलर्स असोसिएशनच्या वतीने साथी पोर्टल-२ या प्रणालीविरोधात राज्यभरातील सर्व कृषी केंद्रधारक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याच्या कारणाने या प्रणालीच्या विरोधात सर्व कृषी केंद्रधारकांनी आपापली दुकाने बंद ठेवण्याचा आंदोलनरुपी निर्णय घेतला होता. याच अनुषंगाने दि.२८ ऑक्टोबर २०२५ रोजी भोकर येथील महाराष्ट्र फर्टिलायझर्स सीड्स डीलर्स असोसिएशनच्या वतीने एकदिवसीय दुकाने बंदचे आंदोलन करण्यात आले.
साथी पोर्टल -२ प्रणाली आमलात आणल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर खत,बियाणे,कीटकनाशके मिळण्यास व मिळवून देण्यास अडथळा निर्माण होत आहे.या प्रणालीच्या त्रुटींविरुद्ध व शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.२८ ऑक्टोबर २०२५ महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी केंद्रे एकदिवसीय लाक्षणिक बंद ठेवण्याचा आंदोलनरुपी निर्णय महाराष्ट्र फर्टिलायझर्स सीड्स डीलर्स असोसिएशने घेतला होता.या निर्णयास पाठींबा देण्यासाठी व हे आंदोलन करण्याच्या अनुषंगाने भोकर तालुका सीड्स फर्टिलायझर्स अँड पेस्टीसाईड्स असोसिएशनच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा व तालुका कृषि अधिकारी यांना तालुकाध्यक्ष उत्तमराव देशमुख बटाळकर,उपाध्यक्ष महेश चक्रवार,सचिव सुनिल लामकाणीकर यांसह आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने निवेदन दिले होते.तसेच दि.२८ ऑक्टोबर २०२८ रोजी भोकर शहर व तालुक्यातील सर्व कृषि दुकाने बंद ठेवून साथी पोर्टल -२ प्रणालीचा निषेध व्यक्त करण्यात आला.या आंदोलनास भोकर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close